
कुडाळ : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेने आता वेग घेतला आहे. कुडाळ तालुक्यात गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत तिसऱ्या दिवशी अर्जांच्या विक्रीने उच्चांक गाठला असून, इच्छुकांची तहसील कार्यालयात मोठी गर्दी पाहायला मिळाली.
तिसऱ्या दिवसाची आकडेवारी:
आज एकाच दिवसात एकूण ९२ अर्जांची विक्री झाली.
जिल्हा परिषद सदस्यत्व: ३१ अर्ज
पंचायत समिती सदस्यत्व: ६१ अर्ज
निवडणूक प्रक्रियेच्या पहिल्या तीन दिवसांत कुडाळ तालुक्यातून आतापर्यंत एकूण १५७ उमेदवारी अर्ज खरेदी करण्यात आले आहेत. अर्ज विक्रीचा हा आकडा पाहता, यावेळची निवडणूक अत्यंत अटीतटीची आणि 'रेकॉर्ड ब्रेक' उमेदवारांची असणार असल्याचे चिन्हे दिसत आहेत.
विकल्या गेलेल्या १५७ अर्जांपैकी अधिकृत राजकीय पक्षांचे उमेदवार किती आणि अपक्ष म्हणून नशीब आजमावणारे किती, याची सविस्तर आकडेवारी प्रशासनाकडून लवकरच जाहीर केली जाणार आहे.
प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारी निवडीवरून सध्या खलबते सुरू असतानाच, इच्छुकांनी मात्र अर्ज पदरात पाडून घेत आपली तयारी दर्शवली आहे. आता प्रत्यक्षात किती अर्ज दाखल होतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.










