दुचाकी घसरून अपघात ; तरुणाचा मृत्यू

Edited by: उमेश बुचडे
Published on: January 19, 2026 19:35 PM
views 443  views

कणकवली : कणकवली तालुक्यातील बिडवाडी हायस्कूलजवळ सोमवारी सकाळी 10 च्या सुमारास दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून दुसरा तरुण किरकोळ जखमी झाला आहे.

समोरून येणाऱ्या एसटी बसला पाहून दुचाकीस्वाराने अचानक ब्रेक लावल्याने दुचाकी स्लीप झाली. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून दुचाकी रस्त्यावर घसरली आणि दोघेही रस्त्यावर फेकले गेले.

या अपघातात सुनील उर्फ पिंट्या मल्हारी भिसे (वय १९) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दुचाकी स्वार अरुण परमेश्वर शेंडगे (वय २१) हा किरकोळ जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.पुढील तपास कणकवली पोलीस करत आहेत.