न्हावणाने झोळंबेच्या आगळ्यावेगळ्या शिमगोत्सवाची सांगता !

Edited by: विनायक गांवस
Published on: April 02, 2024 08:59 AM
views 298  views

सावंतवाडी : झोळंबे गावातील श्री देवी माऊली पंचायत देवस्थानच्या नऊ दिवसांच्या शिमगोत्सवाची विविध धार्मिक कार्यक्रम, पारंपरिक खेळ, कळसातील न्हावणाने सोमवारी रात्री उशिरा सांगता झाली. झोळंबे गावचा आगळावेगळा शिमगोत्सव पाहण्यासाठी हजारो नागरिक उपस्थित होते.

येथील शिमगोत्सव प्रसिद्ध आहे. होळी पोर्णिमेपासून सुरू होणा-या या सणाची रंगत रोंबटांनी व विविध खेळांनी वाढत जाते. अंगात देवतांचा संचार झालेले मानकरी, देवतीर्थ (न्हावण) भरलेला कळस डोक्यावर घेऊन निशाणासह अनवाणी गावठणात येतात. डोक्यावरच्या कळसाला संचारी व्यक्ती हातांचा आधार न देता भर उन्हातही गावभर अनवाणी धावत फिरतात. हे येथील वैशिष्टय असून हे दृश्य पाहण्यासाठी हजारो भाविक गोवा, कर्नाटक राज्यातून येतात.