
सिंधुदुर्ग : २४ वा झी सीने अवॉर्ड २०२६ हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार असल्याची घोषणा करण्यात आली. झी समूहाने आयोजित केलेल्या झी सिने अवॉर्ड कार्यक्रमात राज्याचे मंत्री व सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली. हा कार्यक्रम म्हणजे एक पुरस्कार सोहळा नसून संपूर्ण सिंधुदुर्ग आणि कोकणकरांचा स्वप्नपूर्ती सोहळा असेल असा विश्वास मंत्री श्री.राणेंनी व्यक्त केला आहे.
ते पुढे म्हणाले, कोकण म्हणजे कलेचे माहेरघर असून कलेचा समृद्ध वारसा लाभलेल्या कोकणातून महाराष्ट्राला अनेक दिग्गज कलाकार आणि साहित्यकार दिले आहेत. यासोबतच सिनेक्षेत्रातही कोकणचे मोठे योगदान आहे. कोकणातील कलासंस्कृतीला वाव मिळावा, ती जपली जावी असा माझा मानस आहे. ह्या हेतुन झी समूहाने आयोजित केलेल्या झी सिने अवॉर्ड कार्यक्रमास उपस्थित राहून पुढच्या वर्षीचा "२४ वा झी सीने अवॉर्ड २०२६" सिंधुदुर्ग येथे संपन्न अशी घोषणा केल्याचे राणेंनी जाहीर केले. या सोहळ्याच्या निमित्ताने बॉलिवूड मधील अनेक दिग्गज कलाकार आपल्या कोकणात येतील. इथली संस्कृती, परंपरा यांचा अंगिकार करतील. यामुळे कोकणातील पर्यटनाला देखील चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे येणार २०२६ वर्ष सिंधुदुर्गसाठी विशेष ठरणार आहे