
कणकवली : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुक लवकरच आचार संहिता लागण्याची शक्यता आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाने केलेली मागणी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली असून, त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे चित्र आता स्पष्ट झाले असून, राजकीय हालचालींना वेग येणार आहे. प्रत्येक जण आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची मोर्चेबांधणी करण्याची सुरुवात करत आहे.










