जि. प. - पं. स. साठी महायुतीची रणनीती ठरणार

खा. नारायण राणे घेतील हाती सूत्र
Edited by:
Published on: January 15, 2026 10:40 AM
views 386  views

सिंधुदुर्ग : जिल्हा परिषद, पंचायत समिती, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार दि.१६ जानेवारी २०२६ रोजी कणकवलीत स्वामी विवेकानंद सभागृहात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक दुपारी २ वा. आयोजित करण्यात आली आहे.

महायुतीच्या या बैठकीला भाजपाचे ज्येष्ठ नेते खा. नारायण राणे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे आणि कुडाळ-मालवणचे आ.निलेश राणे, सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत आदि उपस्थित राहणार आहेत.

शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वा. भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक होणार आहे. तर दुपारी २ वाजता महायुतीची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. तर सायंकाळी ५ वा. महायुतीची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.