
सिंधुदुर्गनगरी : भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची बैठक शुक्रवार १६ जानेवारीला प्रहार भवन कणकवली येथे सकाळी १०.३० वाजता होणार आहे. या बैठकीला खासदार नारायणराव राणे, पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, अजित गोगटे मार्गदर्शन करणार आहेत. सर्व जिल्हा पदाधिकारी, विशेष निमंत्रित, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, सर्व मोर्चा, प्रकोष्ट, जिल्हाध्यक्ष, जिल्हा संयोजक, मंडल अध्यक्ष, मंडल सरचिटणीस, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, लोकप्रतिनिधी, माजी जि. प. व पं. स. सदस्य यांनी उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा जिल्हा कार्यालय प्रमुख समर्थ राणे यांनी केले आहे.










