केसरकर, स्वच्छ चारित्र्याचा माणूस !

मल्टीस्पेशालिटी उभं करणारं म्हणजे करणार : लखमराजे भोंसले
Edited by: विनायक गावस
Published on: November 16, 2024 18:06 PM
views 176  views

सावंतवाडी : स्वच्छ चारित्र्याचा माणूस आमदार पाहिजे. ही प्रतिमा दीपक केसरकर यांच्यामध्ये दिसते‌. आमच्या राजघराण्याचा पाठिंबा त्यांना आहे. समोरचे उमेदवार आमच्यातून तिकडे गेलेले आहेत. त्यामुळे दीपक केसरकर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, युवकांची मोठी शक्ती त्यांच्यासोबत आहे. २३ तारीखचा गुलाल आम्ही उधळणार आहोत असा विश्वास सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले यांनी व्यक्त केला.

तसेच मल्टीस्पेशालिटीचा विषय आमच्या राजघराण्याचा काही कारणांमुळे थांबला गेला होता. मात्र, पुढच्या काळात हे मल्टीस्पेशालिटी उभं करणारं म्हणजे करणार असा विश्वास युवराज लखमराजे भोंसले यांनी व्यक्त केला. गांधी चौक येथील महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. तर, मी अडीच वर्ष भाजपसोबत कार्यरत आहे. दोन चार महिन्यांत राजकारण शिकू शकत नाही. लोकांसाठी काम करावं लागते. त्यांचे प्रश्न सोडवले तरच आपण पुढे येऊ शकतो असा टोला त्यांनी हाणला. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सर्वांगीण विकास करण्यासाठी दीपक केसरकर यांच्यामागे उभे रहा असे आवाहन युवराज लखमराजे भोंसले यांनी केले. 

याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे, महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर, कुडाळ मालवणचे उमेदवार निलेश राणे, युवराज लखमराजे भोंसले, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजप जिल्हा संघटक महेश सारंग, भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर,राष्ट्रवादीचे काका कुडाळकर, सुरेश गवस, माजी नगराध्यक्षा सौ. पल्लवी केसरकर, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख अँड. शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, जिल्हा संघटक दत्ता सामंत, संजू परब, केरळचे अँड. हरीकुमार आदींसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.