जिल्हास्तरीय सुदृढ बालक स्पर्धेचं युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन

Edited by: विनायक गांवस
Published on: August 04, 2024 14:32 PM
views 158  views

सावंतवाडी : सह्याद्री फाउंडेशन, सावंतवाडी नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या मान्सून महोत्सव 2024 च्या जिल्हास्तरीय सुदृढ बालक स्पर्धेत पहिल्या गटात भार्गव दत्ताराम झोळंबेकर, दुसऱ्या गटात विधी विक्रम मोरजकर व तिसऱ्या गटात वेदा देविदास राणे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. सावंतवाडी नगरपालिकेच्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहात रविवारी ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. 

सह्याद्री फाउंडेशनने बाल सुदृढ स्पर्धा घेऊन खऱ्या अर्थाने लहानपणापासूनच मुलं कसे सुदृढ राहिल यासाठी पालकांना एक नवी सवय स्पर्धेच्या माध्यमातून लावून दिली आहे. समाजामध्ये डायबेटिसचे प्रमाण वाढत चालले आहे. हे प्रमाण कमी करायचे असेल तर पालकांनी व लहान मुलांच्या आहाराकडे विशेष लक्ष द्यायला हवे असे मत सावंतवाडी संस्थांचे युवराज लखमराजे भोसले यांनी व्यक्त केले. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडी आयुर्वेदिक कॉलेजचे डॉ. विशाल पाटील, सैनिक पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर, आंबोली सैनिक स्कूलचे संचालक जॉय डॉनटस, सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ, बेबी वर्ड्स च्या संयोजका सौ सुजल राऊळ, फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र मडगावकर, कार्यप्रमुख अँड. संतोष सावंत, सचिव प्रताप परब, खजिनदार हर्षवर्धन धारणकर, प्रल्हाद तावडे, सुहास सावंत, सैनिक स्कूलचे प्राचार्य नितीन गावडे, शशिकांत मोरजकर, गजानन बांदेकर, आर केस सावंत, राजेश पास्ते आदी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे डॉ. पाटील म्हणाले, मोबाईल युग आले आहे. अमेरिकेमध्ये जो सर्वे केला आहे त्या सर्वेमध्ये सहा तास आज मोबाईलचा वापर प्रत्येक व्यक्ती करत आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनशैलीवर मोठा परिणाम झाला आहे. यातून आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. तसेच घराघरात वाद विवाद आणि भांडणे आदी प्रकरही वाढत आहेत. आज पालक मुलांकडे मोबाईल देत आहेत. आपण मुलांकडे त्यांच्या आहाराबाबत लक्ष देतो. परंतु त्यांच्या हातात मोबाईल देऊन त्यांच्या शरीरावर मनावर आतापासूनच मोठा आघात करत आहोत. हेच खरे घातक आहे. याकडे आता पालकांनी विशेष लक्ष द्यायला हवे. मोबाईल पासून आपल्याला व मुलाला बचाव करायला हवा असे ते म्हणाले. संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ व अध्यक्ष रवींद्र माडगावकर यांनी आपले विचार मांडले. यावेळी आर्किटेक पदवी प्राप्त केल्याबद्दल ए.एस.राऊळ याचा गौरव करण्यात आला. सुदृढ बालक स्पर्धेत जवळपास 70 हून अधिक मुलाने जिल्हाभरातून भाग घेतला. स्पर्धेचा अधिकार प्रथम वयोगट एक ते पाच प्रथम क्रमांक भार्गव दत्ताराम झोळंबेकर सावंतवाडी, द्वितिय अंश योगेश शेटये कुंभ्रल तृतीय अथर्व सतीश सांगेलकर, शिरशिंगे. दुसऱ्या गटात पाच ते आठ प्रथम विधी विक्रम मोरजकर, सावंतवाडी द्वितीय दर्श जनार्दन चोडणकर, तृतीय शौर्य नंदकुमार नरतवडेकर सावंतवाडी, तिसऱ्या गटात आठ ते बारा प्रथम वेदा देविदास राणे, द्वितिय श्रेया लाडजी राऊळ, तृतीय क्रमांक संस्कृती शैलेश सरमळकर कोलगाव यानी प्राप्त केला‌. या विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण 19 ऑगस्टला नाथ पै सभागृहात सकाळी 11 वाजता महोत्सव समारोप कार्यक्रमात केले जाणार आहे. परीक्षक म्हणून डॉक्टर विशाल पाटील यांनी काम पाहिले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आंबोली सैनिक स्कूल, सैनिक पतसंस्था, बेबीस वर्ड्स या सर्व टीमने विशेष सहकार्य मिळाले.