
सावंतवाडी : प्रा.सचिन पाटकर यांना २०२४ चा युवा सिंधुदुर्ग भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. किल्ले पर्यटन महोत्सव सेवा संशोधन केंद्र व अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग, यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येते.
याकरिता प्रा.सचिन पाटकर हे गेली १८ वर्ष प्राध्यापक म्हणून कार्यरत असून सदस्य - कोकण जिओग्राफर असोसिएशन ऑफ इंडिया,सचिव - समर्थ पर्यटन सहकारी संस्था कुडाळ, सचिव - हितेंद्र फाउंडेशन सिंधुदुर्ग,सचिव - सावली फाउंडेशन सिंधुदुर्ग. अध्यक्ष - इंडियन इंडस्ट्रियल को.ऑफ.सोसायटी,लि. कुडाळ, अध्यक्ष : कोकण विभाग,सोशल मीडिया फ्रंट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार महाराष्ट्र राज्य, या विविध पदांवर सध्या कार्यरत असून गेली २४ वर्ष त्यांचे जिल्ह्यातील राजकीय,शैक्षणिक व सामाजिक कार्यात मोलाचे योगदान आहे. त्यांना समाजकार्याची दखल घेता व सर्व गोष्टींचा विचार करता त्यांना युवा सिंधुदुर्ग भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. असे पत्र समितीचे अध्यक्ष डॉ.बी.एन.खरात यांच्या माध्यमातून त्यांना सुपूर्त करण्यात आले आहे.
राष्ट्रीय बहुभाषिक साहित्य कला पर्यटन सामाजिक संमेलन व सन्मान सोहळा रविवार दि.२६ मे २०२४ रोजी सकाळी १०:३० ते १२:३० या वेळेत "मामा वरेकर नाट्य सभागृह मालवण, सिंधुदुर्ग." या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येईल.