
कणकवली : युवा संदेश प्रतिष्ठान पुरस्कृत व भाजपा नाटळ-सांगवे आणि हरकुळ जिल्हा परिषद आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कनेडी बाजारपेठ येथे या शिबिराचे आयोजन केलं होत. याच उद्घाटन डॉ. विद्याधर तायशेटे यांचा हस्ते करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत व सौ. संजना सावंत यांची प्रमुख उपस्थितीती होती.
या शिबिरात मोतीबिंदू तपासणी, चष्मे वाटप, हर्निया, अॅपेंडीस तपासणी, महीलांसाठी गर्भपिशवी तपासणी करण्यात आली. या शिबिरात डॉ. आचरेकर, डॉ. प्रियांका निबरे (विवेकानंद नेत्रालय कणकवली), डॉ. विजय पगारे ( जिजाऊ संस्था ठाणे), डॉ. गुरुदास मुरकुटे (ऑप्टीशियन), डॉ. अनुजा भोसले (प्राथमिक आरोग्य केंद्र कनेडी), डॉ. चोडणेकर सहभागी झाले होते. शिबिरात 120 मोतीबिंदूचे रुग्ण आढळून आले असून त्यांची शस्त्रक्रिया स्वामी विवेकानंद नेत्रालय कणकवली येथे मोफत करण्यात येणार आहे. तर एकूण 250 लोकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. हर्निया व अॅपेंडीसच्या 15 रुग्णांचे मोफत ऑपरेशन संदेश (गोट्या) सावंत व संजना संदेश सावंत यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.
या शिबिराला सांगवे सरपंच बाबु सावंत, उपसरपंच अभिजित काणेकर, माजी सरपंच विजय भोगटे, दिगवळे सरपंच संतोष घाडीगावकर, उपसरपंच तुषार गावडे, नाटळ सरपंच सुनील घाडीगावकर, करंजे सरपंच सपना मेस्त्री, गांधीनगर सरपंच मंगेश बोभाटे, नरडवे सरपंच बाबु सावंत, सांगवे तंटामुक्ती अध्यक्ष प्रदीप सावंत, ग्रामपंचायत सदस्य राजेश सापळे, राजु पेडणेकर, करूळ सरपंच सौ.समृध्दी नर, कोंडीये सरपंच ऋतुराज तेंडुलकर, सुभाष सावंत, मयुरी मुंज, राजश्री पवार, स्मिता मालडीकर, महेश खादारे आदि उपस्थित होते.