
कुडाळ : युवासेना सचिव वरुण सरदेसाई दिनांक ११ सप्टेंबरला सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. ते 6 ठिकाणी कॉलेज कक्ष उद्धाटन करणार आहेत. या कार्यकमाला खासदार विनायक राऊत,आमदार वैभव नाईक,जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर,युवासेना विस्तारक अमित पेडणेकर,युवती सेना विस्तारक रुची राऊत,जिल्हाप्रमुख संजय पडते,जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या दौऱ्यात वरुण सरदेसाई युवकांशी संवाद साधणार असून युवा सेनेतील पदाधिकारी नियुक्ती देखील करण्यात येणार आहे. सर्व युवासेना पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन युवासेना जिल्हाप्रमुख मंदार श्रीकृष्ण शिरसाट यांनी केले आहे.