
कुडाळ : कोकण युवा स्वाभिमान संघटना, दक्ष्य युवक भारत संघटना, छत्रपती राजे प्रतिष्ठान, राज पाठकर युवा मंच, युवा विकास संघटना रत्नागिरी या संघटनानी आज इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांना जाहीर पाठींबा दिला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा अनंतराज पाटकर यांनी कुडाळात केली. कुडाळ येथील हाॅटेल यशधारा येथे पत्रकार परिषद घेत अनंतराज पाटकर यांनी ही घोषणा केली.
अखेर भाजप युवा वाॅरायर्सचे माजी जिल्हाध्यक्ष अनंतराज पाटकर यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. याची घोषणा अनंतराज पाटकर यांनी केली. यावेळी अनंतराज पाटकर अध्यक्ष कोकण युवा स्वाभिमान संघटना, मिली मिश्रा, अध्यक्ष,आदित्य बटावले, सचिव दक्ष युवक भारत संघटना, मिहिर तांबे, विकास वेंगुर्लेकर,सुहास ढवळे,सागर कुंभार,ओंकार काळे,प्रतीक थोरवे ,अनिरुद्ध ढवळे आदी उपस्थित होते.