
वेंगुर्ला : वेंगुर्ला शहरातील विविध भागातील युवकांनी जिल्हा संघटक संजू परब यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. याच पार्श्वभूमीवर मागील काही दिवसात युवसेनेच्या माध्यमातून तालुक्यात संघटनावाढीसाठी आपल्या कामाचा सपाटा लावणाऱ्या युवासेना प्रमुख पदाधिकारी यांचा संजू परब यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. जिल्हाप्रमुख हर्षद डेरे यांनी हा सत्कार स्वीकारला.
सप्तसागर येथील शिवसेना कार्यालयाच्या ठिकाणी हा पक्षप्रवेश पार पडला यावेळी युवासेना तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे व शहरप्रमुख सागर गावडे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील समीर वेंगुर्लेकर, आर्यन वेंगुर्लेकर, मोहित आरोलकर, आनंद कळेकर, चिराग बगेल, संग्राम सामंत, गौरेश सावंत, रुपेश सावंत, यश चव्हाण, अमेय गावडे, चेतन ओसरगावकर, लक्ष्मण गोळवणकर, रियाज शेख, साईराज परब, पराग सावंत, ऋषभ शेगले, फरान शेख, निखिल जगताप या युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, विकास योजना समन्वयक सुरज परब, शहरप्रमुख उमेश येरम, उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर, सुहास कोळसूलकर, युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, महिला उपजिल्हा संघटक शीतल साळगावकर, युवासेना तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, युवासेना शहरप्रमुख सागर गावडे, उपतालुकाप्रमुख कौशिक परब, सलील नाबर, परशुराम परब, विभागप्रमुख दत्ता साळगावकर, संजय परब, अमित गावडे, नयन पेडणेकर, मितेश परब, अण्णा वजराटकर, प्रभाकर गावडे, संतोष परब, युवतीसेना तालुकाप्रमुख योगिता कडुलकर यांच्यासाहित तालुक्यातील शाखाप्रमुख, बुथप्रमुख उपस्थित होते.