सावंतवाडीतील तरुणांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Edited by: विनायक गांवस
Published on: May 02, 2024 06:08 AM
views 154  views

सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील तरुणांचा राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा आणि कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांचे सेवाकार्य यांच्यावर विश्वास दाखवत जाहीर प्रवेश केला.

पक्ष संघटन व वाढीसाठी तसेच जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी नव्याने प्रवेश केलेले सहकारी जोमाने काम करतील असा अर्चना घारे परब यांनी विश्वास दाखवला आणि नव्याने प्रवेश झालेल्या तरुणांना पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी अमोल नाईक, गणपत पराड़कर, बाबु कुबल, अक्षय साळगावकर, शामला कुबल, ऊर्मिला कोरगावकर, आनंद कुबल, सप्रेम परब, गोकुलदासा परब, रविंद्र कोरगावकर, कार्तिक पराड़कर, गोविंद पराड़कर, रामा गावड़े, वासुदेव कुबल, दत्तप्रसाद कोरगावकर, संगीता केनी,सरस्वती केनी, रेश्मा कोरगावकर,सरस्वती  नाईक, मीना नाईक, दीप्ती नाईक, गायत्री पराड़कर, सिद्धेश कोरगावकर, मधुरा कुबल, एकनाथ नाईक, अनुजा कोरगावकर, पायल कुबल, रुक्मिणी नाईक या तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला. या प्रवेशावेळी त्यांनी होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत लागेल ती सर्वोतोपरी मदत करू असे आश्वासन देखील दिले. 


सावंतवाडी परिसरातील तरुणांचा ओघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे दिसून येत आहे. याचवेळी नव्याने प्रवेश केलेल्या तरुणांमध्ये अमोल नाईक यांची अध्यक्ष, मळेवाड जि.प.मतदार संघ युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, रेश्मा कोरगावकर  यांची अध्यक्ष मळेवाड जि. प.मतदारसंघ महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, बाबू कुबल यांची पाडलोस बूथ कमिटी उपाध्यक्ष आणि अक्षय साळगावकर विद्यार्थी अध्यक्ष मळेवाड जि.प.मतदारसंघ पदी निवड केली. याप्रसंगी माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, अजित नातू, नितीशा नाईक, विवेक गवस, सावली पाटकर, संजय भाईप, हृतिक परब आणि सुनीता भाईप आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.