युवक राष्ट्रवादीच्या विशाल जाधव यांचा 'कोकण उद्योगरत्न' पुरस्काराने सन्मान..!

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: September 01, 2023 20:35 PM
views 91  views

वैभववाडी : कोकण युवा प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या कोकण उद्योगरत्न' पुरस्काराने युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष विशाल जाधव यांना सन्मानित करण्यात आले आहे. जाधव यांनी फर्निचर व्यवसायाच्या माध्यमातून कोळपे गावात रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

डोंबिवलीतील मराठा हितवर्धक मंडळाच्या सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजन साळवी, पद्मश्री गजानन माने, निवृत्त सचिव चंद्रकांत माने, माजी परिवहन सभापती राजेश कदम, प्राध्यापक डॉ. विनय भोळे, उद्योजक विश्वास चव्हाण आदींची उपस्थिती होती.

या वर्षी मानाचा कोकण उद्योग रत्न पुरस्कार युवा उद्योजक विशाल जाधव यांना देण्यात आला. त्यांनी कोळपे सारख्या ग्रामीण भागात प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उद्योग क्षेत्र निवडले.त्यात प्रचंड मेहनत व चिकाटीच्या जोरावर उद्योग यशस्वी करून दाखवला.या उद्योगांमुळे या भागातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन कोकण युवा प्रतिष्ठानने श्री  जाधव यांची या पुरस्कारासाठी निवड केली. त्यांना कोकण उद्योगरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले.

कोकण युवा प्रतिष्ठान ही संस्था मुंबईस्थित असून कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या क्षेत्रात नावलौकिक, यश मिळवणाऱ्या व्यक्तीच्या पाठीवर गेली वर्षे कौतुकाची थाप देत आहे. यावेळी प्रतिष्ठानने डॉ. श्रीधर ठाकूरदेसाई(कोकण भूषण). के. नितीन चंद्रकांत देसाई (कोकण कलायोगी-मरणोत्तर) के.गोपाळराव नारायण राणे (कोकण समाजभूषण मरणोत्तर), विशाल जाधव (कोकण उद्योगरत्न) अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित केले. जाधव यांनी हा पुरस्कार वडिलांना समर्पित करीत असल्याचे तसेच त्यांच्यामुळेच आपण उद्योजक म्हणून घडलो असल्याचे त्यांनी सांगितले.