
कणकवली : मराठा समाजाचे युवा नेते तथा शिवजयंती उत्सव समिती कणकवलीचे अध्यक्ष, युवा उद्योजक प्रताप भोसले यांचा वाढदिवस प्रताप भोसले मित्रमंडळ व शिवजयंती उत्सव समिती कणकवलीतर्फे मंगळवारी उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त कणकवली तालुक्यातील अंगणवाड्यांना बौद्धिक क्षमता वाढविणाऱ्या खेळण्यांचे वाटप करण्यात येत असून त्याचा प्रारंभ कलमठ गावातून करण्यात आला. कलमठ गावातील सात अंगणवाड्यांना बौद्धिक क्षमता वाढविणाऱ्या खेळण्यांचे वाटप करण्यात आले. याबाबात स्थानिक ग्रामस्थ तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांनीही भोसले यांच्याप्रती ऋण व्यक्त केले. प्रताप भोसले हे आपला वाढदिवस दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करतात, याबाबतही उपस्थितांनी कौतुक केले.
कलमठ गावातील कुंभारवाडी, बाजारपेठ, लांजेवाडी, बौद्धवाडी, बिडयेवाडी, गावडेवाडी, गुरववाडी या सात वाड्यांमध्ये खेळण्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, उपसरपंच स्वप्नील चिंदरकर यांनीही प्रताप भोसले यांच्या कार्याचे कौतुक केले. प्रताप भोसले यांच्या सामाजिक कार्याचा आलेख उंचावत जाऊदे, अशा शुभेच्छा मेस्त्री, चिंदरकर यांनी दिल्या. याप्रसंगी शिवजयंती उत्सव समिती कणकवलीचे पदाधिकारी अजिंक्य लाड, कान्हा मालंडकर, संतोष उर्फ पप्पू पुजारे, अभिजीत चव्हाण, प्रविण उर्फ बाळा सावंत, नीतेश पवार, रुपेश नाडकर्णी, तसेच कलमठ ग्रा. पं. सदस्य दिनेश गोठणकर, श्रेयस चिंदरकर, पप्पू यादव, राजू कोरगांवकर, मंदार मेस्त्री, काका कदम, तेजस लोकरे, नितीन पवार, अभिषेक देसाई, कुणाल देसाई, भाई बावकर, सागर राणे, बाबू नारकर, परेश कांबळी आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.