मठ येथील युवकांचा शिवसेनेत प्रवेश

Edited by: दिपेश परब
Published on: October 30, 2025 20:26 PM
views 145  views

वेंगुर्ला : तालुक्यातील मठ गावातील ग्रामपंचायत माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य महादेव उर्फ बंटी गावडे यांच्यासहित उद्योजक तथा भाजप युवा मोर्चाचे समीर नाईक तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बोवलेकर यांच्यासहित कार्यकर्त्यानी शिवसेनेत प्रवेश केला. 

   महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, माजी आमदार राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ येथील शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात हा प्रवेश करण्यात आला.