
देवगड : देवगड तालुक्यात आनंदवाडी येथील युवकांनी भल्यामोठ्या अजगराला अजगराला जंगलात सोडून देत जीवनदान दिले आहे. देवगड आनंदवाडी येथील शिवाजी कुबल यांच्या घरा शेजारी आपल्या भक्ष्याच्या शोधात आलेल्या दहा फुटी व पंधरा किलो वजनाच्या अजगराला सर्पमित्र व आनंदवाडी येथील युवकांनी जंगलात सुखरूप सोडून जीवदान दिले आहे. यावेळी निखिल तारी, नरेंद्र तारी, हार्दिक कुबल,ओम कोयंडे, कौशिक कुबल, प्रज्योत कोयंडे,बाबल कुबल, जयेश कोयंडे, गंगाधर कोयंडे, पियुष जोशी,सिद्धेश पोसम आदी आनंदवाडी येथील युवक उपस्थित होते.आनंदवाडी येथील शिवाजी कुबल यांची पत्नी शिवानी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास आपल्या घरातील मांजरांना जेवण घालण्यासाठी आली असता अजगराने एका मांजराला विळखा मारल्याचे निदर्शनास येताच शिवानी यांनी आरडाओरडा केला.त्यावेळी विकास कोयंडे यांच्यासह आनंदवाडी येथील युवकांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर भटवाडी येथील सर्पमित्र मयेकर यांना बोलावून अन्नाच्या शोधात आलेल्या अजगराला सुरक्षितरित्या पकडले यामध्ये मांजराचा मृत्यू झाला. त्यानंतर सर्पमित्र मयेकर यांनी या भल्या मोठ्या अजगराला सुखरूपरीत्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले आहे.