
देवगड : देवगड तालुक्यातील शिरगाव येथील पुंडलिक अंबाजी कर्ले महाविद्यालय शिरगाव येथे आयोजित मुंबई विद्यापीठाच्या ५७ आंतरमहाविद्यालयीन विभागीय युवा महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
युवा महोत्सव हे विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या सुप्त गुणांना वाव देण्याचे प्रमुख केंद्र आहे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक समन्वयक डॉ. निलेश सावे यांनी युवा महोत्सवा च्या निमित्ताने केले.पुंडलिक अंबाजी कर्ले महाविद्यालय शिरगाव येथे आयोजित मुंबई विद्यापीठाच्या ५७ आंतरमहाविद्यालयीन विभागीय युवा महोत्सव कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक समन्वयक डॉ. निलेश सावे, सिंधुदुर्ग जिल्हयाचे सांस्कृतिक समन्वयक डॉ.आशिष नाईक, डॉ.नितिन वळंजू तसेच कुवळे हायस्कूलचे चेअरमन विजयकुमार कदम व पुंडलिक अंबाजी कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालयाचे चेअरमन संभाजी साटम आदी मान्यवर उपस्थित होते.
कोकणात भरपूर कला असून त्या कलांना बाहेर आणण्यासाठी याच कार्यक्रमांचा आधार घ्यावा लागतो असे मत यावेळी आशीष नाईक यांनी व्यक्त केले. रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई विद्यापीठातील रांगोळी विभागातील gold medallist विलास रहाटे तसेच कार्टूनिस्ट चोपडेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे कार्टून्स काढून उपस्थितांना आश्चर्यचकित केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महविद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापिका मयूरी कुंभार यांनी करून उपस्थितांचे आभार व्यक्त केले. या कार्यशाळेस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४० महाविद्यालयांचे प्रतिनिधी व विद्यार्थी उपस्थित होते.