
देवगड : देवगड तालुक्यातील कातवण येथील आंब्याच्या झाडावरून पडून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
देवगड –जामसंडे सहकार नगर व सध्या कातवण येथील वास्तव्यास असलेल्या संदेश प्रभाकर मांडवकर या ३७ वर्षीय युवकाचा आंब्याच्या झाडावर आंबे काढण्यासाठी चढला असता खाली पडून त्याच्या हनवटीला व छातीला गंभीर दुखापत होऊन त्यात त्याचा मृत्यू झाला.
ही घटना १ एप्रिल रोजी दु. २.२० वाजण्याच्या सुमारास घडली. यासंदर्भात सचिन प्रभाकर मांडवकर वय( ४४)राहणारा जामसंडे सहकारनगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार देवगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजन जाधव या घटनेचा अधिक तपास करीत आहेत