युवासेना सिंधुदुर्ग आयोजित युवा संवाद मेळावा

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: November 19, 2025 19:26 PM
views 7  views

कुडाळ : शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आ. दीपक केसरकर व आ. निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत युवासेना सिंधुदुर्ग आयोजित युवा संवाद मेळाव्याचे आयोजन गुरुवार दिनांक २० नोव्हेंबर २०२५ रोजी सायं. ठीक ३.३० वाजता महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे करण्यात आले आहे.

 या मेळाव्याला पूर्वेशजी सरनाईक (युवासेना कार्याध्यक्ष), राजनजी तेली (माजी आमदार), राहुल लोंढे (युवासेना मुख्य सचिव), किरण साळी (युवासेना सचिव), संजय आंग्रे (उपनेते), दत्ता सामंत (जिल्हाप्रमुख), संजू परब (जिल्हाप्रमुख), दीपलक्ष्मी पडते (महिला सेना जिल्हाप्रमुख), नीता कविटकर (महिला सेना जिल्हाप्रमुख), राहुल अवघडे (युवासेना कोकण निरीक्षक), संग्राम साळसकर (युवा सेना जिल्हाप्रमुख), मेहुल धुमाळे (युवा सेना जिल्हाप्रमुख),हर्षद ढेरे (युवासेना जिल्हाप्रमुख), सोनाली पाटकर (युवती सेना जिल्हाप्रमुख) आदी उपस्थित राहणार आहेत. 

तरी जिल्ह्यातील सर्व युवासेना, युवतीसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शाखाप्रमुख, बूथप्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, कार्यकर्ते आणि युवा शिवसैनिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन युवासेना तालुकाप्रमुख सागर वालावलकर, अनिकेत तेंडोलकर यांनी केले आहे.