युवकाची गळफास लावून आत्महत्या

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: December 19, 2025 10:16 AM
views 52  views

कुडाळ : नेरूर समता नगर येथील 21 वर्षीय जीवन दीपक कदम या युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

नेरूर समता नगर येथील जीवन दीपक कदम याने आपल्या राहत्या घरी घराच्या वाशाला साडीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात त्याचे काका सकाराम सीताराम कदम यांनी या घटनेची माहिती दिली.  यावरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.