
सिंधुदुर्गनगरी : मुंबई-गोवा हायवे कसाल येथे रेल्वे ब्रिजच्या परिसरात समर्थ बांदेकर, श्रेयश दूरकर, स्वस्तिक कारवडे, कार्तिक तोरस्कर, रुपेश शिंगाडे या विद्यार्थ्यांना एक मोबाईल आढळून आला होता. आढळलेला मोबाईल कसाल सरपंच राजन परब यांच्याकडे सुपूर्द केला.
मोबाईलधारकाची स्थानिक पातळीवर चौकशी करता कसाल मधीलच राजू पवार नामक व्यक्तीचा मोबाईल असल्याचे समजताच मूळ मालक पवार यांना तो मोबाईल परत करण्यात आला. या सर्व विद्यार्थ्यांचे दाखवलेल्या प्रामाणिकतेबद्दल विशेष कौतुक होत आहे. कसाल गावचे सरपंच राजन परब यांनी बक्षीसही दिले.










