
सिंधुदुर्गनगरी : पडवे सरपंच आनंद दामोदर यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल असून यासाठी आज विशेष ग्रामसभा संपन्न होत आहे. या अविश्वास प्रस्तावावर मतदान करण्यासाठी सकाळी साडेदहा वाजल्यापासून ग्रामपंचायत परिसरात मोठी गर्दी झाली आहे. पोलिसांचाही योग्य बंदोबस्त असून अविश्वास ठरावरील मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या ठिकाणी अध्यासी अधिकारी म्हणून कुडाळ तालुक्याचे सहाय्यक गटविकास अधिकारी प्रफुल वालावलकर हे काम पाहत आहेत.










