मानसिक स्थिती बिघडल्याने तरुणाची गळफास घेत आत्महत्या...!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: September 30, 2023 11:04 AM
views 292  views

देवगड : मानसीक स्थिती बिघडल्याने वळीवंडे घाडीवाडी येथील दत्तात्रय अनंत घाडी (३४) या युवकाने मांगरामध्ये नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना शुक्रवारी दुपारी १२ वा. सुमारास त्याचा वडीलांच्या निदर्शनास आली.

याबाबत पोलीसांनी दीलेल्या माहीतीनूसार, वळीवंडे घाडीवाडी येथील दत्तात्रय अनंत घाडी अविवाहीत होता.गवंडी काम व मोलमजुरी करून तो उदरनिर्वाह करीत होता.घरी वडील,आई, भाऊ व भावजय असा परीवार असून दत्तात्रय हा रात्री घरी जेवण केल्यानंतर दररोज झोपण्यासाठी घरा जवळच काही अंतरावर असलेल्या मांगरामध्ये झोपायला जात असे. गुरूवारी रात्री १०.३० वा.सुमारास घरातून न जेवता घराजवळ असलेल्या मांगरामध्ये झोपण्यासाठी गेला.सकाळी उशिरापर्यंत तो घरी चहा नाष्ता करण्यासाठी आला नाही म्हणून त्याचे वडील अनंत घाडी हे शुक्रवारी दुपारी १२ वा.सुमारास मांगराकडे त्याला पाहण्यासाठी गेले यावेळी मांगराला पत्र्याचे छप्पर असल्याने त्याचा लोखंडी अँगलला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावलेल्या स्थितीत तो दिसला.त्यांनी तात्काळ घरी येवून भाऊ गजानन याला सांगीतले.

घटनेची खबर गजानन घाडी यांनी देवगड पोलीस स्थानकात दील्यानंतर पोलीस उपनीरीक्षक जीतेंद्र कांबळे, पोलीस हवालदार महेंद्र महाडिक यांनी घटनास्थळी जावून ग्रामस्थांच्या सहकार्याने गळफास लावलेल्या स्थितीत असलेल्या दत्तात्रय याचा मृतदेह काढला.त्यानंतर पंचनामा करून मृतदेहाचे शीरगाव प्रा.आरोग्य केंद्र येथे शवविच्छेदन करण्यात आले.