'यिन'च्या जिल्हाध्यक्षपदी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा स्वराज साळुंखे !

Edited by: देवयानी वरसकर
Published on: February 13, 2024 13:11 PM
views 57  views

रत्नागिरी : उत्साह, चुरस, धाकधूक व जल्लोष अशा वातावरणात यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क अर्थात 'यिन' च्या वतीने रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदाची निवड करण्यात आली. यावेळी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा विद्यार्थी स्वराज साळुंखे यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. निवडणूक ही लेखी परीक्षा, व्यक्तिमत्व विकास चाचणी व मुलाखत अशा तीन टप्प्यात पार पडली. यिनचे जिल्हा प्रतिनिधी प्रसाद गायकवाड यांनी या निवडणूक प्रक्रियेची पाहणी केले. 

निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांना राज्यस्तरीय यिन शॅडो कॅबिनेट मंत्रिमंडळात जाण्याची संधी मिळते. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या स्वराज साळुंखे याला देखील यिनचे बंदर विकास मंत्री हे मंत्री पद मिळाले. 

विद्यार्थ्यांच्या नेतृत्व व गुणांचा विकास व्हावा, यासाठी  यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या वतीने दरवर्षी प्रमाणे घेण्यात आलेल्या निवणुकीत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष व कार्याध्यक्षांना राज्यस्तरीय यिन कॅबिनेट मध्ये मंत्रिपद भूषविण्याची संधी मिळते.

जिल्हास्तरीय निवड झाल्या नंतर मुंबईमध्ये राज्यस्तरीय यिन मंत्रिमंडळाची निवडणूक प्रक्रिया पार पडते. या निवडणूक प्रक्रियेत  सत्ताधारी आणि विरोधी पक्ष असे दोन गट तयार करण्यात आले आणि त्या नंतर सत्ता स्थापन करण्यात आली आणि मंत्रिमंडळाचे स्थापन करण्यात आले व मंत्रिमंडळातील पदांचे वाटप करण्यात आले.

दिनांक ६ जानेवारी ते ८ जानेवारी दरम्यान यशवंतराव चव्हाण सभागृहात शॅडो मंत्रिमंडळाचे तीन दिवसीय अधिवेशन पार पडले.

 गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरी मधील अभिरूप युवा संसद कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांमध्ये राजकीय नेतृत्व कौशल्य विकसित करण्यासाठी उपयोगी पडते यातूनच स्वराज साळुंखे जिल्हा आणि आता राज्यस्तरीय युवा विधानसभेचा अभुभव घेतला आहे.

  सदर उपक्रमासाठी श्रीमती शिल्पाताई पटवर्धन कार्याध्यक्षा रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी सतीश शेवडे कार्यवाह रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी ,प्राचार्य  डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी,  डॉ अपर्णा कुलकर्णी विज्ञान शाखा उपप्राचार्य , डॉ चित्रा गोस्वामी कला शाखा उपप्राचार्य, डॉ यास्मिन आवटे वाणिज्य शाखा उपप्राचार्य डॉ.आनंद आंबेकर अभिरूप युवा संसद समन्वयक , प्रा.निलेश पाटील राज्यशास्त्र विभाग प्रमुख यांनी अभिनंदन केले आहे.