
सावंतवाडी : तांबोळी व असनिये गावात गेल्या चार दिवसापासून विद्युत पुरवठा खंडित आहे. गावात वीज गायब असून संतप्त ग्रामस्थांनी गुरुवारी दुपारी सावंतवाडीतील महावितरण कार्यालय गाठलं. यावेळी ग्रामस्थांनी 'जोपर्यंत आमची लाईट येत नाही तोपर्यंत हलणार नाही' अशी आक्रमक भूमिका घेतली. आम्ही काळोखात दिवस काढतोय अन् तुम्ही फॅन खाली बसून राहतायत अशा शब्दांत तीव्र संताप नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी तांबुळी सरपंच वेदिका नाईक, सदस्य मिलींद देसाई, विलास नाईक, बंड्या देसाई, नितिन, सावंत, भालचंद्र सावंत, शुभम पोपकर, असनिये गावातील राकेश सावंत, जितेंद्र सावंत, शरद सावंत, संजय सावंत, अमित सावंत, दिनकर सावंत, न्हानु सावंत, अमित सावंत, पांडूरंग सावंत, दशरथ सावंत, मुरलीधर सावंत, मिथुन सावंत, बाबल सावंत, लक्ष्मण सावंत, सतिश सावंत, अमोल सावंत, अनुप दामले, मिथुन नाईक, सिता पेडणेकर, राधिका सावंत, माधुरी सावंत, अमिता सावंत, भारती सावंत, भूषण सावंत प्रकाश सावंत, संतोष घोगळे, बाळकृष्ण मेस्त्री, मुरलीधर ठिकार, सौरभ असनकर, सूरज असनकर, अविनाश असनकर, चंद्रकांत भिसे, उमेश भिसे, सुभाष सावंत, महादेव सावंत, ग्रामस्थ उपस्थित होते.