आरडाओरड करून तिकिट मिळत नाही : राजन तेली

Edited by: विनायक गांवस
Published on: June 08, 2024 06:35 AM
views 996  views

सावंतवाडी : भाजपा सर्वसामान्यांचा पक्ष आहे. त्यामुळे पक्षाकडे कोणीही तिकीट मागू शकत. परंतु, आरडाओरड करून पक्ष केव्हाही तिकीट देत नाही असा टोला माजी आमदार राजन तेली यांनी नाव न घेता संजू परब  यांना लगावला. ते सावंतवाडी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरम्यान, मागच्या पालकमंत्र्यांनी युतीमध्ये असताना आमच्या विकासकामांची पत्र देऊन सुद्धा आम्हाला निधी दिला नाही. गेल्या दीड वर्षात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भरघोस निधी दिल्याने सर्वसामान्य जनतेचे काम करू शकलो. त्यामुळेच जनतेने आम्हाला भरभरून मतदान केलं अस मत माजी आमदार राजन तेली यांनी व्यक्त केले.