हळबे महाविद्यालयाच्या योगेश ठाकूर यांना मुंबई विद्यापीठाचा आदर्श कर्मचारी पुरस्कार

Edited by: संदीप देसाई
Published on: September 09, 2023 13:17 PM
views 180  views

दोडामार्ग : दोडामार्गातील  येथील लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्याचे प्राध्यापक प्रज्ञाकुमार गाथाडे यांच्याबरोबरच मुख्य लिपिक योगेश ठाकूर यांना मुंबई विद्यापीठाचा 'आदर्श कर्मचारी' पुरस्कार प्राप्त झाला असून त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. महाविद्यालयाच्या स्थापनेपासून प्रा. गाथाडे व ठाकूर कार्यरत असून महाविद्यालयाच्या जडणघडणीतील ते सहकारी आहेत.

 मुंबई विद्यापीठाने गठीत केलेल्या समितीने त्यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यांना शिक्षकदिनी 5 सप्टेंबर 2023 रोजी मुंबई विद्यापीठाच्या फिरोज शहा मेहता भवनमध्ये मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, माझी कुलगुरू सुहास पेडणेकर व सहाय्यक कुलगुरू अजय भामरे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत हेही उपस्थित होते.पाच हजार रुपये रोख, मानपत्र,स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

    या यशाबद्दल शिक्षक आमदार कपिल पाटील नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोक बेलसरे, चेअरमन अभिजीत हेगशेटये, कोषाध्यक्ष शरद कदम व माजी अध्यक्ष श्रीपाद हळबे यांनीही या दोघांचे अभिनंदन केले असून भावी कार्याला शुभेच्छा दिल्या आहेत.