
बांदा : तालुक्यातील रोणापाल गावचे विद्यमान उपसरपंच कृष्णा परब यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी आज उपसरपंच निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामपंचायत अधिकारी प्रतिभा आळवे यांनी काम पाहिले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य योगेश केणी यांचा एकमेव अर्ज आल्याने सदर निवडणूक ही बिनविरोध झाली.
यावेळी सरपंच योगिता केणी, ग्रामपंचायत सदस्य नमिता शेगडे, अश्विनी गावडे, नंदकिशोर नेमण, कृष्णा परब, आदी उपस्थित होते. हि निवडणूक बिनविरोध झाली. भारतीय जनता पार्टीचे बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, डेगवे माजी सरपंच तथा मंडळ सरचिटणीस मधुकर देसाई, निगुडे माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य समीर गावडे, मडुरा माजी उपसरपंच उल्हास परब, निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे, रोणापाल माजी उपसरपंच कृष्णा परब आदी उपस्थित होते.
या निवडीबद्दल सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले. विशेष बाब म्हणजे सावंतवाडी तालुक्यातील रोणापाल गावच्या पत्नी सरपंच व पती उपसरपंच म्हणून ग्रामपंचायत कारभार हाताळणार आहे.