योगेश कदम यांच्या प्रचाराचा शुभारंभ !

Edited by: मनोज पवार
Published on: November 07, 2024 20:42 PM
views 181  views

मंडणगड : महायुतीमधील सर्व घटक पक्षांच्या मंडणगड तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थिती 7 नोव्हेंबर 2024 रोजी भिंगळोली येथील महापुरुष मंदिरात उमेदवार योगेश कदम यांच्या प्रचाराचे श्रीफळ वाढविण्यात आले. 

यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर, दापोली विधानसभा क्षेत्रप्रमुख आदेश केणे, माजी सभापती अनंत लाखण, युवा सेना राज्य कार्यकारणी सदस्य चेतन सातोपे, शहरप्रमुख  विनोद जाधव, राजेश दिवेकर, संदीप कदम, राजाराम लेंढे, महेंद्र मळेकर, अनंत शिंदे, राहूल पारेख, सिध्देश देशपांडे, अनिल रटाटे, दोस्तमहंमद चौगुले, जयश्री दळवी,  भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश शिगवण, तालिका सरचिटणीस गिरिश जोशी, तालुका उपाध्यक्ष विजय दरिपकर, यश मेहता, विजय शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी सभापती भाई पोस्टुरे, तालुका अध्यक्ष मुझफ्फर मुकादम, जिल्हा बँक संचालक रमेश दळवी, सतिष दिवेकर यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते व तिन्ही पक्षांचे मंडणगड शहर व भिंगळोली येथील समर्थक व तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.

 महापुरुष मंदिरात देवाला साकडे घातल्यावर येऊ घातलेल्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार योगेश कदम हे किमान पन्नास हजारांचे मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.