
बांदा : मळगाव येथील (कै.) उदय रमाकांत खानोलकर वाचनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शालेय वक्तृत्व स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पाचवी ते सातवी गटात योगेश विजयानंद जोशी (राणी पार्वतीदेवी हायस्कूल, सावंतवाडी) याने तर आठवी ते दहावी गटात श्रावणी राजन आरावंदेकर (कुडाळ हायस्कूल) यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
पाचवी ते सातवी गटात अस्मी प्रवीण मांजरेकर (राणी पार्वतदेवी हायस्कूल, सावंतवाडी), विभव विरेश राऊळ ( मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडी) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. दीप्ती आपा सावंत (कुडाळ हायस्कूल) व शमिका राजन आरावंदेकर (कुडाळ हायस्कूल) यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला. आठवी ते गटात आर्या सुयोग सातोसकर (न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा), प्राची गोविंद सावंत (नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. समृद्धी कृष्णा गवस (मळगाव इंग्लिश स्कूल, मळगाव) व रामदास पुंडलिक मोर्ये (श्रीरंग लाडकोबा देसाई विद्यालय, पाट) यांनी उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन बालरोगतज्ञ डॉ. मिलिंद खानोलकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी वाचनालयचे अध्यक्ष हेमंत खानोलकर, संचालक मंडळ उपस्थित होते. पारितोषिकांचे वितरण परीक्षक चंद्रकांत सावंत, भरत गावडे, सुमेधा सावंत, पत्रकार निलेश मोरजकर यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यवाह गुरुनाथ नार्वेकर यांनी केले तर आभार संचालक पृथ्वीराज बांदेकर यांनी मानले.