टेंबवली ग्रा. पं. तीत योग उत्साहात

Edited by: नागेश दुखंडे
Published on: June 21, 2025 15:27 PM
views 84  views

देवगड : आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत टेंबवलीच्या वतीने माध्यमिक विदयामंदिर टेंबवली येथे दिनांक २१ जून रोजी योग दिन साजरा करण्यात आला हा योग दिन टेंबवली सरपंच हेमंत राणे व माध्यमिक विदयामंदिर टेंबवली मुख्याध्यापक सुनिल गांवकर यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला.

या कार्यक्रमात सकाळच्या सत्रात योगाभ्यास सत्र आयोजित करण्यात आले, ज्यामध्ये माध्यमिक विदयामंदिर टेंबवलीची विदयार्थी तसेच जि. प. शाळा टेंबवली विदयार्थी तसेच अंगणवाडीतील मुले , ग्रामपंचायत कर्मचारी , शिक्षकवृंद यांनी सहभाग नोंदवला. या उपस्थितांना जि.प. शाळा टेंबवली मुख्याध्यापक प्रदिप मराठे सर यांनी विविध योगासने, प्राणायाम व ध्यान याचे प्रात्यक्षिक करून दाखवले तसेच त्याचे आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम समजावून सांगितले. यावेळी मुख्याध्यापक प्रदीप मराठे यांनी योग दिनाचे महत्त्व विषद करताना सांगितले की, “योग हा केवळ व्यायाम नव्हे, तर तो एक जीवनशैली आहे. योगाद्वारे शरीर, मन आणि आत्मा यांच्यात समतोल राखता येतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात योग हे मानसिक आणि शारीरिक आरोग्य टिकवण्यासाठी एक प्रभावी साधन आहे.

यावेळी शाळेच्या परीसरात वृक्षारोपण व स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या संपुर्ण कार्यक्रमांत टेंबवली ग्रामपंचायत अधिकारी एच .बी. तेर्से, पं .स. देवगड समुह समन्वयक विनायक धुरी, शिक्षक सागर घाडी, सचिन तात्पुरते, वसंत कदम, नंदु कोळेकर, अंगणवाडी सेविका शेवंती घाडी, सहाय्यक सुप्रिया राणे, पोलीस पाटील अमोल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माध्यमिक विदयामंदिर टेंबवली मुख्याध्यापक सुनिल गांवकर तर आभार शिक्षक सागर घाडी सर यांनी मानले.