निरोगी आयुष्यासाठी योगा आवश्यक : दिप्ती देसाई

पाच दिवसांच्या योग शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 27, 2023 18:23 PM
views 146  views

वैभववाडी : योगाभ्यास हा चिरंतन काळापासून सुरू आहे. आजच्या धावपळीच्या युगात माणसाला निरोगी आयुष्य ठेवण्याठी योगासने करणे आवश्यक आहे. योगाभ्यास सर्वांसाठी गरजेचा आहे, अस मत तहसीलदार दिप्ती देसाई यांनी व्यक्त केले.

वैभववाडी योग समिती, उद्योजक सुनील नारकर व माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांच्यावतीने अर्जून रावराणे विद्यालय येथे पाच दिवसीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन बुधवारी सायंकाळी झाले. यावेळी व्यासपीठावर नायब तहसीलदार श्री. यमगेकर, कोकणसाद LIVE चे मुख्य संपादक सागर चव्हाण, उद्योजक सुनील नारकर, महाराष्ट्र राज्य महिला योग समिती राज्य कार्यकारिणी सदस्या रमाताई जोग, माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, नगरसेवक रोहन रावराणे, नगरसेविका अक्षता जैतापकर, दिपश्री खाडीलकर, रश्मी आंगणे, प्रिया कोचरेकर, विद्या पाटील, मानसी सावंत, श्रावणी रावराणे, सोनल लोके, शरद नारकर, प्राचार्य भास्कर नादकर,रत्नाकर कदम आदी उपस्थित होते.

सौ. देसाई यांनी योगाबाबत आपले अनुभव उपस्थितांना सांगितले. सुनील नारकर यांनी उमाताई जोग यांच्या कार्याच कौतुक केले. पुढील वर्षी भव्यदिव्य शिबिर घेण्याच आश्वासन दिले. योगाचा प्रचार होण्यासाठी मी सर्वोतोपरी सहकार्य करेन असा शब्द दिला. सागर चव्हाण आपल्या भाषणात म्हणाले, योगाभ्यासाठी मिडिया म्हणून या योगसमितीच्या आम्ही सदैव पाठीशी राहू.