आरोंदा हायस्कूलचा योग दिन !

Edited by: संदीप देसाई
Published on: June 22, 2024 08:41 AM
views 163  views

सावंतवाडी : आरोंदा हायस्कूल आरोंदा व कला वाणिज्य उच्च माध्यमिक विद्यालय, आरोंदा या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत  जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना योगशिक्षण देण्यासाठी प्रशालेचे माजी मुख्याध्यापक अरुण धर्णे हे उपस्थित होते.

 प्राणायाम, सूर्यनमस्कार व योगासनाचे विविध प्रकार व योगासनांचे दैनंदिन जीवनामध्ये शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी असणारे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. यावेळी प्रशालेचे क्रीडाशिक्षक दिवाल्या वसावे व कलाशिक्षक चंदन गोसावी यांनीही विद्यार्थ्यांना विविध योग प्रात्यक्षिके करून दाखवली. तसेच विद्यार्थ्यांनीही सक्रियपणे योगासनाच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सिद्धार्थ तांबे सेवाज्येष्ठ शिक्षिका श्रीमती माजगावकर, श्री राठोड , गावडे, कोरगावकर आदी  शिक्षक कर्मचारी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. एकूणच योग दिनाचा कार्यक्रम अतिशय उत्तम रीतीने साजरा करण्यात आला.*