
कणकवली : तालुक्यातील आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात योग प्रार्थनेने करण्यात आली प्रशालेतील सहाय्यक शिक्षिका जान्हवी हर्डीकर यांनी योगासनाचे जीवनातील महत्व स्पष्ट केले यावेळी प्रशालेचे क्रीडा शिक्षक अमोल चौगुले आणि सुयोग राजापकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध योगासन प्रकारांचे प्रात्यक्षिक केले त्यावेळी ध्यान, वज्रासन, अर्ध उष्ट्रासन, उष्ट्रासन, अर्ध चक्रासन, ताडासन , प्राणायाम यासारखे विविध प्रकार सादर करण्यात आले. इयत्ता सहवी मधील कांचन आडूलकर हिने प्रत्येक आसना पासून होणारे फायदे विषद केले तसेच माही दयानी आणि हादिया सारंग यांनी प्रतिनिधित्व करत योगासनाचे प्रात्यक्षिक दाखविले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका निलम डांगे यांनी उपस्थित सर्वांना योगदिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे निवेदन जान्हवी हर्डीकर यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप शांती मंत्र आणि पसायदानाने करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यानी परिश्रम घेतले.