भोसले नॉलेज सिटीत योग दिवस उत्साहात...!

Edited by:
Published on: June 21, 2023 20:17 PM
views 136  views

सावंतवाडी : भोसले नॉलेज सिटी येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस आज मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. योगाभ्यास म्हणजे केवळ शारीरिक व्यायाम नसून मन आणि आत्मा यांची अनंत क्षमता जाणून घेणारे विज्ञान आहे. आपल्या जीवनातील योगाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि त्याचा प्रचार करण्यासाठी जागतिक योग दिवस साजरा करण्यात येतो..

योगाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी व लोकांनी योगाच्या माध्यमातून निरोगी राहावे हा याचा मुख्य हेतू आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलसह यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक व यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजचे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते..