
सिंधुदुर्गनगरी : शारीरिक व मानसिक आरोग्य राखण्यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे. योग ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. निरोगी जीवनाच्या या पद्धतीला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे त्यामुळेच गेल्या दशकभरा पासून 21 जुन रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन जगभरामध्ये साजरा केला जातो. असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ मोहन दहीकर यांनी केले.
या योग दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस मुख्यालय, सिंधुदुर्ग येथे योग दिन साजरा करण्यात आला. यामध्ये पोलीस अधीक्षक, डॉ. मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले, यांच्या सह सिंधुदुर्ग पोलीस दलातील 10 पोलीस अधिकारी व 141 पोलीस अमंलदार यांनी सहभग नोंदविला. यावेळी योग शिक्षक चंद्रकांत परब यांनी योग अभ्यास घेऊन पोलीस अधिकारी व अंमलदार यांना दैनंदिन कामकाजातून तणावमुक्त राहण्याचे सोपे योगासने यांचा प्रत्यक्षिकासह योग अभ्यास करण्यात आला.
पोलीस अधीक्षक, डॉ. मोहन दहिकर यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांना दररोज योग व व्यायाम कसा महत्वाचा आहे आणि याचे माध्यमातून पोलीस अधिकारी व अंमलदार कसे तणावमुक्त होवू शकतात याबद्दल मार्गदर्शन केले आणि दररोज वेळ भेटेल तेव्हा योगा करण्याबद्दल देखील मार्गदर्शन केले.