मनाच्या एकाग्रतेसाठी योगा महत्वाचा : राजेंद्र मोर्वेकर

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: June 21, 2025 19:03 PM
views 38  views

मालवण : मन आणि शरीर यांना जोडणारी योग ही एक प्राचीन कला आहे चित्त स्थिर ठेवण्यासाठी, मनाची एकाग्रता साधण्यासाठी योग हा महत्वाचा असल्याने योग ही आजच्या धकाधकीच्या जीवनात जीवनशैली बनली आहे असे प्रतिपादन सहजयोग सिंधुदुर्ग परिवारचे योग साधक राजेंद्र मोर्वेकर यांनी येथे बोलताना केले. 

जागतिक योग दिनाचे औचित्य साधत आज मालवण तालुक्यात शाळा तसेच सामाजिक संस्थाच्यावतीने योग दिन साजरा करण्यात आला  मालवणच्या श्री रेकोबा माध्यमिक विद्यालयात सहजयोग सिंधुदुर्ग परिवारातर्फे विद्यार्थी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी सहज योगाची माहिती व प्रत्यक्षिके दाखविण्यात आली त्यावेळी राजेंद्र मोर्वेकर हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर योग साधक निलेश करलकर, श्वेता मोर्वेकर, अनुष्का मोर्वेकर  सारिका तळगावकर, चेतन भोजने प्रशालेचे शिक्षक शुभदा शिंदोळकर, श्रीनाथ फणसेकर, संभाजी कोरे, रामचंद्र गोसावी, रोहिणी दिघे, मिताली मोंडकर आदी व इतर उपस्थित होते. 

यावेळी मुख्याध्यापक संजय खोचरे यांनी स्वागत करून जीवनात योगाचे महत्व विशद केले. शेवटी श्रीनाथ फणसेकर यांनी आभार मानले यावेळी यशवंत गावकर, दत्तात्रय गोसावी तसेच विद्यार्थी उपस्थित होते