
कणकवली : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कणकवली येथील उत्कर्ष हॉटेल हॉल येथे स्वामी समर्थ सेवेकरी भक्तांसाठी योग शिबिर आयोजित करण्यात आले होते. स्वामी समर्थ सेवेकरी मंडळ, पतंजली योग समिती कणकवली व योगप्रज्ञा योगा क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडले. या शिबिराचा अनेक स्वामी समर्थ भक्तांनी लाभ घेतला.
शिबिरामध्ये मार्गदर्शन पतंजली योग समितीचे योगशिक्षक किसन ठोंबरे व योगप्रज्ञाच्या संचालिका अरुणा ठोंबरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विविध योगा प्रकार, प्राणायाम व ध्यान धारणा यांचा अभ्यास घेण्यात आला. योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व साधकांना पटवून देण्यात आले. तसेच दररोज योग व प्राणायाम करण्याचा संकल्प स्वामी समर्थ सेवेकरी भक्तांनी केला.