YBIT बनवणार 'इंजिनिअर्स' !

आर्टीफिशिअल इंटेलिजंस, मशिन लर्निंग आहे तरी काय ?
Edited by: विनायक गावस
Published on: July 22, 2023 12:54 PM
views 88  views

सावंतवाडी शैक्षणिक क्षेत्रातील अग्रगण्य BKC ब्रॅण्डचे शिल्पकार अच्युत सावंत-भोसले यांनी नुकतीच भोसले पॉलिटेक्निक हे 'यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी' (YBIT) झाल्याची घोषणा केली होती. त्यानुसार चराठा येथील भोसले नॉलेज सिटी संकुलात YBIT हे डिग्री इंजिनिअरिंग कॉलेज सुरु झाले आहे. मुंबई विद्यापीठ संलग्न या कॉलेजमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग,मेकॅनिकल इंजिनिअरिंग व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या शाखा उपलब्ध आहेत. या पदवी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ.रमण बाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. बाणे हे उच्चविद्याविभूषित असून त्यांना २४ वर्षांचा प्रदीर्घ असा अध्यापनाचा अनुभव आहे. N.I.T. संस्थेमधून कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या विषयात त्यांनी डॉक्टरेट प्राप्त केली आहे. कॉम्प्युटर सोबतच आर्टीफ़िशिअल इंटेलिजंस (AI), मशीन लर्निंग (ML), इलेक्ट्रोनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन या विषयात त्यांचं प्राविण्य आहे. देश विदेशातील नामांकित प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा अनुभव त्यांना असून आजमितीपर्यंत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सुमारे चाळीसपेक्षा जास्त शोध निबंध त्यांनी प्रकाशित केले आहेत. YBIT च्या प्राचार्य पदाचा पदभार त्यांनी नुकताच स्वीकारला असून यानिमित्ताने कोकणचं प्रथम दैनिक 'कोकणसाद'नं घेतलेली ही विशेष मुलाखत...!



पॉलिटेक्निकवरून डिग्री कॉलेज करण्याचा विचार का आला ?

▪️उत्तर : यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकची ही लेव्हल अपग्रेड आहे. पॉलिटेक्निकची लेव्हल अपग्रेड डिग्री असून ते यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (YBIT) झालं आहे. YBIT खाली डिप्लोमा आणि डिग्री दोन्ही इन्स्टिट्यूट आहेत. याआधी डिप्लोमा कॉलेज होत. त्यात दोन वेळा एनबीए नामांकन मिळवलं आहे. त्यामुळे मुलांच्या उच्च शिक्षणाची गरज ओळखून याच ठिकाणी डिग्रीची सोय करण्यासाठी या कॉलेजची निर्मिती केली आहे. कारण, चांगल्या डिग्री शिक्षणासाठी मुलांना बाहेर जावं लागायचं. डिग्रीच शिक्षण इथं उपलब्ध नव्हतं. YBIT मुळे आता भोसले नॉलेज सिटीमध्ये डिग्री शिक्षणाची सोय देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. पॉलिटेक्निकवरून डिग्री कॉलेजचा विचार करण्यामागे संस्थापक अच्युत सावंत-भोसले यांचा हाच मानस होता. त्यामुळे  डिप्लोमामध्ये जे क्वालिटी शिक्षण दिलं जायच तसंच आता डिग्रीमध्ये देखील दिलं जाणार आहे. त्या उद्देशानेच हे डिग्री कॉलेज आणलेलं आहे.


इंजिनिअरिंग का करावे ?

▪️उत्तर: आपल्याला इंजिनिअरिंगमध्ये आवड असेल तर या क्षेत्राची निवड करावी. १२ वी सायन्स, मॅथमॅटिक्स केलेली मुलं ही इंजिनिअरिंगला जावू शकतात. यात आपण जे शिकतो त्याच अॅप्लिकेशन करून एखादं उपकरणं तयार करणं, सायन्स मॅथमॅटिक्सच ज्ञान उपयोगात आणनं त्यालाच इंजिनिअरींग असं आपण म्हणतो. त्याची जर मुळात आपल्याला आवड असेल तरच हे क्षेत्र निवडावं. आपल्या आवडीच असल्यानं हे क्षेत्र अतिशय चांगल आहे. हे क्षेत्र फार मोठ आहे. इंजिनिअरिंगमध्ये अनेक प्रकार आहेत. त्यामुळे आपल्या आवडीप्रमाणे जाता येत, काम करता येत. या क्षेत्रात विविध जॉब्स मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. इंजिनिअरची उपलब्धता जास्त लाभते त्यामुळे या क्षेत्राला डिमांड जास्त आहे. म्हणूनच हे क्षेत्र चांगल आहे.


कुठली शाखा चांगली ?

▪️उत्तर : इंजिनिअरिंगमध्ये सगळ्याच शाखा या महत्त्वाच्या असतात. जग हे टेक्नॉलॉजीमुळे चालेल आहे‌. कृषी, मेडिकलसह प्रत्येक क्षेत्रात टेक्नॉलॉजीचा हातभार आहे. इंजिनिअरिंगच्या सगळ्या शाखांच योगदान त्यात आहे. आपण निवडलेल्या शाखेत स्वतःला स्कील निर्माण करता आलं तर आपण कुठेही सामावून जाऊ शकतो. या क्षेत्रात चांगलं करिअर करू शकतो.


इंजिनिअरिंग करताना कुठली स्कील विकसित करावी ?

▪️उत्तर : आजच युग हे स्पर्धात्मक युग आहे. नुसत शिक्षण घेतल, डिग्री घेतली, डिप्लोमा केला म्हणजे आपलं भवितव्य घडेल अस नाही. तशी परिस्थिती आता राहिलेली नाही. आपल्याला डिग्रीसह स्कीलही महत्वाचं आहे. चांगले स्कील निर्माण करून भविष्यात त्याचा उपयोग केला पाहिजे. 4 वर्षांच्या डिग्रीच्या या प्रवासात एखाद्या गोष्टीत आपल्याला आवड असेल त्यात परिपक्वता आणनं, स्कील निर्माण करणं आवश्यक आहे. जेणेकरून त्या गोष्टीत आपण करिअर निर्माण करू शकतो. टेक्निकल स्कीलसह कम्युनिकेशन, लॉजिकल स्कीलसह क्रिटिकल थिंकिंग करता आलं पाहिजे. कॉम्प्युटरमध्ये कोडिंग स्कील चांगलं आलं पाहिजे. शिक्षणाव्यतिरिक्त अशा स्कील डेव्हलप कराव्या लागतात. इंजिनिअरिंगला अॅडमिशन घेत असताना आपलं धेय्य निश्चित करावं. त्यानुसार आपलं स्कील डेव्हलप केल्यास हमखास चांगलं करिअर करता येईल.


जिल्ह्यातील १२ वी नंतर उपलब्ध उच्च शिक्षणाच्या संधीबद्दल तुमचं मत ?

▪️उत्तर: उच्च शिक्षणाच्या संधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. सगळ्या क्षेत्रात उच्च शिक्षणाची संधी जिल्ह्यात आहे. परंतु, शिक्षणात क्वालिटी महत्वाची असते. शिक्षणाचा तो दर्जा आपणास इतरत्र मिळतोय का ? हे देखील पहावं लागतं. पॉलिटेक्निकबाबत बोलायचं झालं तर एनबीए नामांकन मिळवलेली ही संस्था आहे. तस शिक्षण सिंधुदुर्गात इतर कुठे मिळतय का ? हा विचार करणं आवश्यक आहे. क्वालिटी टेक्निकल एज्युकेशन देणं फार महत्त्वाचे असतं. असं शिक्षण देणाऱ्या संस्था फार मोजक्या आहेत. त्यामुळे डिग्री सुरु करताना एक महत्त्वाच पाऊल संस्थापकांनी उचलेल आहे. क्वालिटी एज्युकेशन देऊन आपलं कॉलेज महाराष्ट्रासह देशात उच्च पातळीवर नेऊन ठेवायचा त्यांचा मानस आहे.


'कॉम्प्युटर इंजिनिअरिंग' व 'कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग'मध्ये फरक काय ?

▪️उत्तर : प्रवेशावेळी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग व कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगमधल्या फरकाबाबतचा प्रश्न मुलांना असतो. आपल्याकडे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग या व्यतिरिक्त मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या शाखा आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करण्याची संधी या शाखांत आहे. सायन्स म्हणजे कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीचे जे प्रिन्सीपल्स आहेत त्याची थेअरी आहे ती कॉम्प्युटर सायन्समध्ये मोडते ती शिकवली जाते. तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग हा अॅप्लिकेशनचा भाग आहे. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्येही हा पार्ट येतोच. सायन्स शिवाय हा पार्ट येणार नाही. त्यामुळे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये सायन्स शिकवलं जाणार नाही असं समजू नये. या दोन्ही शाखा एकच आहेत. दोघांचा अभ्यासक्रमही सारखा आहे. एखाद दुसरा विषय वेगळा असू शकतो. सध्याची अभ्यासक्रम तयार करण्याची पद्धत ही चॉईस बेस्ड् आहे‌. विषयाची निवड आपणास करता येते. 'थर्ड' आणि 'फायनल' इयरला चॉईसनुसार विषय निवडता येतात.


'आर्टीफिशिअल इंटेलिजंस' व 'मशीन लर्निंग'बद्दल तुमचं मत ?

▪️उत्तर : आर्टीफिशिअल इंटेलिजंस, मशीन लर्निंग हे सध्याचे कुतुहलाचे विषय आहेत. आपण नेहमी वापरतो त्यात हे विषय आहेत. गुगल, युट्यूब, फ्लिपकार्ट वापरताना रेकमेंडेशन्स येतात‌. आपल्या लाईकींगचे व्हिडिओ ते रेकमेंड करतात. मशीन ते रेकमेंड करत त्याला मशीन लर्निंग असं म्हणतात. हा आर्टीफिशिअल इंटेलिजंस झाला. असा प्रत्येक अॅप्लिकेशनमध्ये इंटेलिजंस आणण्याचा प्रयत्न केला जातो. मोबाईलला आपण स्मार्ट फोन म्हणतो कारण त्यात इंटेलिजन्स आहे. त्यात 'एआय' वापरलेला आहे. मनुष्याला तो मदत करत असतो. हे दोन्ही कोर्स  'कॉम्प्युटर इंजिनियर' आणि 'कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग' या दोन्ही शाखांत शिकवले जातात. 'एआय'च्या चॅटजीपीटीचा मोठा परिणाम सध्या होत आहे. ऑटोकोडिंग होत आहे. परंतु, आपल्याकडे अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट जास्त आहे. त्यात हे थोडस वापरल जाईल. पण, त्याचा अधिक परिणाम होईल असं वाटत नाही. कारण, भारतातील प्रोब्लेम वेगळे आहेत. 'एआय' सोडून भरपूर लक्ष देण्यासारख्या गोष्टी आपल्याकडे आहेत. ज्याची गरज आज भारताला आहे‌. एवढं वरच्या स्तरावर आपण अजून पोहचलो नसून बेसिक प्रॉब्लेम सोडवणं महत्वाच आहे. ते पहिली सोडवणं गरजेचं आहे. मेकॅनिकल इंजिनिअर, कोअर ब्रॅन्चीसनाही तेवढं महत्त्व आहे. नुसत एआय, एमएल म्हणून चालणार नाही. बेसिक प्रॉब्लेम पहिले सोडवण आवश्यक आहे असं आयआयटी मद्रासचे डायरेक्ट प्रा‌.कामकोटी यांच मत आहे.


BKC परिवारात जॉईन होण्यामागचा उद्देश काय ?

▪️उत्तर : 'भोसले नॉलेज सिटी'च शिवधनुष्य पेलत चराठा भागात शैक्षणिक ब्रॅण्ड उभा करण्याच काम करत अच्युत सावंत-भोसले यांनी जगात अवघड काही नसतं हे सिद्ध करून दाखवलं आहे. डिग्री कॉलेजची थोडीफार जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली आहे. ती जबाबदारी मी चांगल्या पद्धतीने निभावेन याचीही मला खात्री आहे. अजुन बऱ्याच गोष्टी डेव्हलप करायच्या आहेत. प्राध्यापकांची नेमणूक करायची आहे. एन.आय.टी. सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये वावरल्यामुळे व आंतरराष्ट्रीय स्तरावरील युनिव्हर्सिटींचा अनुभव असल्यामुळे याचा उपयोग या ठिकाणी होईल. चांगला प्राध्यापक वर्ग इथे आणण्यासाठी अधिक भर असेल‌. मी स्वतः सिंधुदुर्गचा आहे. त्यामुळे माझी पुर्वीपासूनची इच्छा आहे की इथल्या मुलांना क्वालिटी एज्युकेशन कसं देता येईल ? मी जे शिक्षण घेऊन आलोय त्याचा फायदा माझ्या सिंधुदुर्गच्या विद्यार्थांना कसा होईल यासाठी माझा प्रयत्न आहे. त्यामुळेच मी इथे आहे.

पाहण्यासाठी क्लिक करा...

https://youtu.be/lTWgrfFHgz8