
दोडामार्ग: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे आयोजित पूर्व उच्च प्राथमिक, (इयत्ता ५ वी) शिष्यवृत्ती परीक्षेत दोडामार्ग तालुक्यातील जि.प. पूर्ण प्राथमिक विद्यामंदिर घोटगेवाडी शाळेचा कु. यशवंत शाबी तुळसकर हा ग्रामिण सर्वसाधारण मधून २५६ गुण मिळवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवीला आहे. या घवघवीत यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्य. व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने नुकताच सत्कार केला आहे.
ओरस येथील या कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास मोडक, प्रमुख अतिथी सौ. अंकिता मोडक, डॉ.प्रा. श्रीराम दिक्षीत, श्री. प्रमोद खांडेकर, सौ, गायत्री सातोसकर, संघटनेचे अध्यक्ष श्री.अनिल राणे सर, सचिव नानचे सर, कार्याध्यक्ष श्री. प्रदिप सावंत, उपाध्यक्ष धनश्री गावडे, सुहास देसाई, वैभव केंकरे सावंतवाडी अध्यक्ष, मालवण अध्यक्ष घाडीगांवकर, कणकवली अध्यक्ष निलेश पारकर, दोडामार्ग अध्यक्ष श्री. शाबी तुळसकर, कुडाळ अध्यक्ष विनायक पाटकर, विजय गवस आदी जिल्हातील शिक्षकेतर कर्मचारी मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते.
कु. यशवंतचे सर्वत्र कौतूक होत असून . गटशिक्षणाधिकारी नदाफ साहेब, केंद्रप्रमुख सौ जोशी , मुख्याध्यापक श्री दळवी सर ,वर्गशिक्षक सौ दिक्षा दळवी, श्रीराठोड बोरकुटे सर यांनी विशेष कौतूक केले. स्वतःच्या यशात शाळेतील शिक्षकांचा आणि माझ्या आईवडीलांचा वाटा मोठा असल्याचे यशवंत सांगतो. घोटगेवाडी सरपंच उपसरपंच ग्रामस्थ यांनी त्याच अभिनंदन करून कौतूक केले आहे. कीर्ति विद्यालय घोटगेवाडी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशवंतच्या या यशाबद्दल सत्कार करून अभिनंदन केले .
गणित प्रज्ञा परीक्षेत कुमार यशवंत शाबी तुळसकर याने राज्यस्तरीय सिल्व्हर कॅटॅगिरीत प्रमाणपत्र मिळवून यश संपादन केले आहे .
कु .यशवंत हा दोडामार्ग तालुका शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री शाबी तुळसकर यांचा मुलगा आहे . कुमार यशवंत याची नवोदय विद्यालयासाठी पहिल्या यादित निवड झालेली आहे .कोणतेही ॲकॅडमी क्लासेस न करता जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांच्या मार्गदर्शनाने हे यश मिळवल्याने तालुक्यात कौतूक होत आहे.