यशवंत शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा २०२५ चा निकाल जाहीर

Edited by: विनायक गांवस
Published on: April 02, 2025 20:17 PM
views 82  views

सावंतवाडी :  संदीप गावडे फाउंडेशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या यशवंत शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा २०२५ चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत सावंतवाडी तालुक्यातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन केले आहे.

सावंतवाडी नंबर २ शाळेतील विद्यार्थी आराध्य अमोल आपटे याने २०० पैकी सर्वाधिक १९८ गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. जि. प. शाळा आरोंदा मानशीची कु. वृंदा विलास आवडण हिने १८८ गुण मिळवून द्वितीय, तर माडखोल मेटवाडी शाळेची कु. स्वानंदी शरद राऊळ आणि माजगाव शाळा नंबर ३ ची उर्वी अमित टक्केकर या दोघींनी १८४ गुण मिळवत अनुक्रमे तृतीय आणि चौथा क्रमांक पटकावला आहे. तळवडे नंबर - ९ चा विद्यार्थी १८२ गुणांसह पाचव्या स्थानावर आला आहे.

     यावर्षीच्या यशवंत शिष्यवृत्ती स्पर्धेसाठी एकूण ५८३ विद्यार्थी बसले होते, ज्यापैकी ४७३ विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. परीक्षेचा निकाल उल्लेखनीय असून तो ८३ टक्के लागला आहे. या नेत्रदीपक यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

यशवंत शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा समितीच्या सर्व सदस्यांनी या शैक्षणिक कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अथक परिश्रम घेतले, त्याबद्दल संदीप गावडे फाउंडेशनच्यावतीने त्यांचे आभार मानण्यात आले आहेत. तसेच, सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.