संविधान रक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी यशवंत जाधव

कार्याध्यक्षपदी पांडुरंग जाधव
Edited by: विनायक गांवस
Published on: August 19, 2024 08:32 AM
views 106  views

सावंतवाडी : अखिल भारतीय संविधान रक्षक संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी यशवंत जाधव तर कार्याध्यक्षपदी पांडुरंग जाधव यांची निवड करण्यात आली. अखिल भारतीय संविधान रक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास कांबळे आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व गोवा प्रभारी अध्यक्ष किशोर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये ही निवड करण्यात आली. 

या बैठकीत सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी संतोष जाधव, तालुका उपाध्यक्षपदी दीपक जाधव तर तालुका सदस्यपदी मोरेश्वर जाधव यांच्या निवड करण्यात आली. यावेळी विश्वास कांबळे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अखिल भारतीय संविधान रक्षक संघटना सक्षम करण्याच्या दृष्टीने बहुमोल मार्गदर्शन केले. तर किशोर जाधव यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अखिल भारतीय संविधान रक्षक संघटनेच्या सर्व तालुका व विभाग कार्यकारणीची लवकरच निवड करण्यात येणार असल्याचे सांगितले.