यशतेज फाउंडेशनच्या तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेस उत्सफुर्त प्रतिसाद

Edited by:
Published on: March 11, 2025 13:48 PM
views 123  views

मंडणगड : यशतेज फाउंडेशनतर्फे मंडणगड येथे 8 व 9 मार्च 2025 रोजी भव्य तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन आयोजन करण्यात आले होते. क्रीडा क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजीत या स्पर्धेत दापोली मंडणगड खेड या तालुक्यातील नामांकित खेळाडू सहभागी झाले होते. 8 मार्च 2025 रोजी आयोजीत स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास तहसिलदार अक्षय ढाकणे  गटविकास अधिकारी विशाल जाधव, पोलीस निरिक्षक नितीन गवारे, गटविकास अधिकारी नंदलाल शिंदे यांच्यासह  तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, खेळाडू व कॅरमप्रेमीची उपस्थिती लाभली. 

९ मार्च २०२५ रोजी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाची प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेच्या विविध गटांचे अंतीम सामने रंगले. अठरा वर्षाखालील मुलांच्या गटात सोहम बुटाला  खेड याने प्रथम तर हर्ष मर्चंडे मंडणगड याने व्दितीय क्रमांक मिळवीला. पुरुष दुहेरी स्पर्धेत ओम मोरे नवाज फकी  दापोली यांनी प्रथम  क्रमांक तर गणेश चव्हाण भूषण चिखले मंडणगड यांनी व्दितीय क्रमांक मिळवीला. पुरुष एकेरी स्पर्धेत ओम मोरे  दापोली याने प्रथम तर  गणेश चव्हाण मंडणगड यांनी व्दितीय क्रमांक मिळवीला. अठरा वर्षाखालील मुलांच्या स्पर्धेत 12 खेळाडू  पुरुष एकेरी स्पर्धेत 41खेळाडू,  पुरुष दुहेरी स्पर्धेत 32 खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धा कार्यक्रम  यशस्वी करण्यासाठी फाऊंडेशनचे अध्यक्ष अँड. यश घोसाळकर यांच्या नियोजनाखाली सर्व सदस्यांनी मेहनत घेतली.