
देवगड : देवगड तालुक्यातील टेंबवली जि.प. पूर्ण प्रा.शाळेची विद्यार्थिनी कु. यशश्री प्रमोद टेंबुलकर ची स्कॉलरशिप परिक्षेसाठी निवड झाली आहे. टेंबवली जि.प. पूर्ण प्रा.शाळा नंबर-१ ची विद्यार्थींनी यशश्री प्रमोद टेंबुलकर टेंबवली इयत्ता ५ वी स्कॉलरशिप परिक्षेत पात्र ठरली असून तिला शाळेचे मुख्याध्यापक मराठे सर, कदम सर आणि कोळेकर सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले असून तिचे शाळेच्या वतीने, शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन होत आहे.तसेच तिला प्रशालेचे शिक्षक, पालकवर्ग यांच्यावतीने शुभेच्छा देखील देण्यात आल्या आहेत.