
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडीचा विद्यार्थी कु.यश प्रवीण सावंत याने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादित केले. सेवाभावी भारतीय संस्था सावंतवाडी द्वारा आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यश प्रवीण सावंत याने "बालपण हरवत चाललंय" या विषयावर ओघवत्या शैलीत वक्तृत्व सादर करून इयत्ता पाचवी ते सातवी या गटात तृतीय क्रमांक संपादित केला. त्यास रोख रक्कम, प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले तसेच बांदा नट वाचनालयातर्फे दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी आयोजित बालवाचक कथाकथन स्पर्धेत कु. यश प्रवीण सावंत याने पाचवी ते सातवी या गटासाठी असलेल्या 'संतांच्या जीवनातील प्रसंग' या विषयास अनुसरून उत्कृष्ट कथाकथन सादर करत द्वितीय क्रमांक पटकावला. या कामगिरीबद्दल देखील त्यास रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले, कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले, विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व मंडळाचे संचालक दिलीप देसाई , मंडळाचे सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत ,डॉ.सतीश सावंत, मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगावकर तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.











