अवैध दारुवर कारवाईचे लेखी आश्वासन | मनसेचे आंदोलन स्थगित

जानेवारी 2022 पासून तब्बल 48 गुन्हे दाखल
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 12, 2022 18:24 PM
views 245  views

बांदा : बेकायदा दारू वाहतूक रोखण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. जानेवारी 2022 पासून आतापर्यंत तब्बल 48 गुन्हे दाखल करण्यात आले असून 34 वाहनासह 3 कोटी 28 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यापुढेही कारवाई सातत्य राहणार आहे, असे लेखी आश्वासन एक्साईज अधिकाऱ्याने दिल्यामुळे मनसेने पुकारलेले आंदोलन स्थगित करण्यात आले.

दरम्यान इन्सुली तपासणी नाक्यावर असलेली कर्मचा-यांची कुमक कमी पडत आहे तरीही आम्ही सातार्डा तळवणे,आरोंदा,ओटवणे पोटवडीदा या ठिकाणी अधिकची नाकी उभारले असून बेकायदा दारूवर आमचे लक्ष आहे असेही आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे.

मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अवैद्य दारू वाहतूक विरोधात मनसे कडून आज येथील इन्सुलि तपासणी नाक्यावर डबे वाजवा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता परंतु त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन देत आमच्या खात्याअंतर्गत कारवाई सुरू आहे त्यामुळे आंदोलन करू नका अशी विनवणी संबंधित पदाधिकाऱ्यांना केली त्यानंतर मनसेने आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला