घरडा केमिकल्समध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा

१९ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प
Edited by: मनोज पवार
Published on: June 06, 2025 19:00 PM
views 168  views

चिपळूण :  घरडा केमिकल्स लिमिटेड, लोटे येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा करताना वृक्षवल्ली आम्हा सोयरे.. हा संदेश देत वृक्ष लागवड करण्यात आली. या विशेष प्रसंगी आस्थापनाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. घरडा केमिकल्स लिमिटेडचे प्रमुख श्री. आर. सी. कुलकर्णी, उत्पादन प्रमुख श्री. पी. बी. पाटील आणि श्री. ओडल कृष्णन आणि घरडा कर्मचारी यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (MPCB) चिपळूण उपप्रादेशिक अधिकारी श्री. श्रीपाद कुलकर्णी आणि क्षेत्र अधिकारी अधिकारी  उत्कर्ष शिंगारे यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. 

वृक्षारोपणाचा संकल्प  गतवर्षी २०२४-२५ मध्ये घरडा केमिकल्स लिमिटेड मार्फत ३८ हजार विविध प्रकारचे वृक्ष कंपनी आजूबाजूला लावण्यात आले आणि येत्या चालु वर्षात १९,००० झाडांचे वृक्षारोपण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल कर्मचारी वर्गानेही उचलले आहे. शिफ्ट संपल्यानंतर प्रत्येक कर्मचाऱ्याला एक रोपटे देण्यात आले. त्यांनी या झाडांची जोपासना करून पुढील पर्यावरण दिन २०२६ रोजी त्यांचे विकसित झालेल्या स्थितीचे फोटो शेअर करण्याचे आश्वासन दिले. तसेच, वृक्षारोपणाच्या वेळीच त्यांनी छायाचित्रे घेत त्यांना एचआर विभागाकडे नोंदणीसाठी देण्याचेही वचन दिले, जेणेकरून पर्यावरण संवर्धनाची प्रक्रिया दस्तऐवजीकरण करता येईल. या उपक्रमामुळे पर्यावरण जागृती वाढवून हिरवाई टिकवण्याचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.